Home > News > आणि आमदाराने धरली महिलेसोबत फुगडी..

आणि आमदाराने धरली महिलेसोबत फुगडी..

फुगडी हा खेळ फक्त महिलांचाच आहे असं म्हटलं जातं. जातीपाती, स्त्री-पुरुषतेच्या भेदभावात गढूळ झालेल्या या समाजात वारी हे एकमेव समतेचे प्रतीक आहे. महिलांचे साधे खेळ जरी खेळले तरी सुद्धा या समाजव्यवस्थेत पुरुषांना नावे ठेवली जातात. मात्र आषाढी एकादशी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या वाऱ्यांमध्ये हा सर्व भेदभाव मिटून जातात.

आणि आमदाराने धरली महिलेसोबत फुगडी..
X

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले होते. दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरून दिंड्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. या दींड्या रस्त्याने येत असताना ठिकठिकाणी मुक्काम करत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी उभे आणि गोल रिंगण सोहळे होतात. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. या दिंड्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या असतात. त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले असतात. त्यांच्यात एकोपा असतो. तेथे कोणीच उच्च आणि नीच्च नसतो सर्वजण एकसमान असतात. प्रत्येकाला पंढरपूरची ओढ असते. उन्ह,वारा,पाऊस झेलत या दिंड्या पंढरपूरला येत असतात. रस्त्याने येत असताना अनेक जाती धर्माचे लोक या दिंड्या आणि वारकऱ्यांना भोजन देण्याचे काम करतात. अनेक जण सेवाभावी वृत्तीने मोफत सेवा देतात. वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची ओढ असते. म्हणूनच ते न थकता चालत राहतात. ते सातत्याने विठू नामाचा गजर करत चालत राहतात. या वारकऱ्यांच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका असते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. याच वारीत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील हे एका महिलेसोबत फुगडी घालत सहभागी झाले. वारी म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे एक प्रतीक आहे. एखादा माणूस वारीत सहभागी झाला की तो सर्व भेदभाव विसरून विठ्ठलाच्या भक्तीसागरात वाहून जातो. या ठिकाणी मग कुठलाच भेदभाव राहत नाही.

फुगडी फक्त महिलाच घालतात किंवा हा महिलांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. मात्र ज्यावेळी आषाढी एकादशीनिमित्त वेगवेगळ्या भागातून वाऱ्या निघतात या वाऱ्यांमध्ये महिलाच काय तर अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत वारकरी आपणास महिलांसोबत फुगडी घालताना दिसतात. कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील एका महिलेसोबत फुगडी घालत असतानाचे फोटो समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. त्यांनी हे फोटो फेसबुकवर शेअर करत म्हटला आहे की, टाळ-विणा वाजतो मृदंग,

रंगला भजनात पांडुरंग...!

फुगडी खेळतो आम्ही तुझ्या अंगणात,

होवून तल्लीन तुझ्या नाम स्मरणात...!





Updated : 12 July 2022 10:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top