'माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय' रेणू शर्मा यांचे ट्वीट
X
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यामुळे चर्चेत आलेल्या गायिका रेणू शर्मा यांचे आणखी एक ट्वीट चर्चेत आलं आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. याला उत्तर म्हणून रेणू शर्मा यांनी हे ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये रेणू यांनी "मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते. उलट माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय" धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. असं रेणू शर्मा यांनी म्हटलं आहे.
काय आहे रेणू शर्मा यांचं ट्वीट?
"मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
This is motivated action of Mr. Dhananjay Munde after my complaint. I was never involved in any honey trap activity as alleged. Infact Mr.krishna Hegde started the conversation with me. He met me in birthday party of Mr. Pratap SirNaik(MLA).
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
The allegations made by Mr. Krishna Hedge is false bogus and baseless. He is trying to tarnish my image and defame me in the society and also trying distract me from filing the FIR against Mr. Munde this is counter attack on me since I am filing FIR against Mr. Munde.
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021