Home > News > स्मृती इराणी संतापल्या; काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटिसा..

स्मृती इराणी संतापल्या; काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटिसा..

स्मृती इराणी संतापल्या;  काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटिसा..
X

खोट्या कागदपत्राच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावावर परवाना घेऊन अवैध बार चालवण्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्यावर झाल्यानंतर भडकलेल्या इराणी यांनी थेट काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटिसा धाडल्या आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येकडून गोव्यात अवैध मद्यालय (बार) चालवत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध करत काँग्रेसने थेट स्मृती इराणी यांच्या राजीनामाची मागणी केली होती. आभार एका मृत व्यक्तीच्या नावावर असलेल्या परवाण्यावर चालत असल्याचा काँग्रेसचा आरोप होता.

गोव्यातील एक्साईज अधिकाऱ्याने कशा पद्धतीची नोटीसही सदर बारला पाठवली होती.

आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना स्मृती इराणी यांच्याकडून कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे खोटे, निराधार आरोप करून काँग्रेस नेत्यांनी आपली आणि आपल्या कन्येची बदनामी चालविली असून त्यांना त्याबद्दल आपली जाहीर माफी विनाअट मागावी, असे इराणी यांनी या नोटिशीत बजावले आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, इराणी यांच्या कन्येच्या गोव्यातील या कथित उपाहारगृह व मद्यालयाबाहेर रविवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेसने शनिवारी इराणी यांच्या कन्येवर गोव्यात अवैध मद्यालय चालवत असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची दखल घेत इराणी यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

Updated : 25 July 2022 12:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top