"2024 ला पंतप्रधान पदावर मराठी नेतृत्व बसणार" - दीपाली सय्यद
X
राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ आता देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपकडे बहुमत असले तरी विरोधकांनी एकत्र येत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आले, पण शरद पवार यांनी स्वत: त्यास नकार दिला. तसेच ट्विटरवरुन त्यांनी याबाबतची माहितीही दिली. पण देशाच्या सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीत उतरण्यास शरद पवार यांनी नकार का दिला. यानंतर आज शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज एक ट्विट करत राष्ट्रपतीपदासाठी पवारसाहेबांनी नकार दिला असला तरी पवारसाहेबांमुळे 2024 मध्ये पंतप्रधानपदावर मराठी नेतृत्व बसणार असल्याचं म्हटलं आहे.
काल शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी स्वतः नकार दिला. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर २०२४ मध्ये मराठी नेतृत्वच बसणार मग पक्ष भाजप असो या मविआ.जय महाराष्ट्र
राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर २०२४ मध्ये मराठी नेतृत्वच बसणार मग पक्ष भाजप असो या मविआ.जय महाराष्ट्र @BJP4Maharashtra @MumbaiNCP
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022
हे ही वाचा…
शरद पवार यांनी स्वत: त्यांच्या नवस नकार दिला याची 5 करणे काय आहेत पहा..
1. शरद पवार यांना सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हायचे नाहीये.
2. वाढते वय हे देखील शरद पवार यांनी नकार दिल्याचे एक कारण असल्याची चर्चा आहे.
3. राष्ट्रपतीपदासाठी आवश्यक तेवढे बहुमत सत्ताधारी भाजपकडे असल्याने पराभवाची शक्यता जास्त आहे.
4. शरद पवार आजपर्यंत BCCI वगळता कोणतीही निवड़णूक हरलेले नाहीत.
5. भविष्यात मोदी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.
याच संदर्भात ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनीही शरद पवार या निवडणुकीत का उतरणार नाहीत, याची कारणं दोन दिवसांपूर्वी दिली होती. "शरद पवार आजवर एकही निवडणूक हरलेले नाहीत. अपवाद बीसीसीआयच्या निवडणुकीचा. मात्र त्यावेळीही त्यांचं गणित एक-दोन मतांनी हुकलं. मात्र त्याचा पुरेपुर वचपा त्यांनी पुढच्या खेपेस काढला. कारण शरद पवार कोणतीही निवडणूक कमालीच्या गांभीर्याने लढवतात. विरोधकाला ते कःपदार्थ मानत नाहीत. राष्ट्रपतीपद स्वीकारणं म्हणजे क्रियाशील राजकारणातून निवृत्त होण्याची मानसिक तयारी करणं. शरद पवार यांनी आजवर राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेले नाहीत. लोक माझे सांगाती या पुस्तकात त्यांनी तसं स्पष्ट नोंदवलं आहे. आपण नेते आहोत आणि त्यामुळे आपल्याला निवृत्ती नाही याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली आहे. म्हणूनच तर ते आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्याात दौरे करतात, गरज असेल तेव्हा देशाच्या इतर भागातही जातात. वर्षातून चार-सहा सभा घेण्याचं राजकारण ते करत नाहीत वा उरलो उपकारापुरता अशीही त्यांची धारणा नाही. वास्तविक काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवायला हवं. परंतु ते टाळण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधीपक्षांचे सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या उमेदवारीला आपण अनुकूल आहोत, असे संकेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले असावेत." असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता.