मोसमी पाऊस दरवर्षीपेक्षा पाच दिवस आधीच अंदमानमध्ये, हवामान खात्याचा अंदाज
X
मोसमी पाऊस रविवारी म्हणजे 15 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी हे मोसमी वारे अंदमान या ठिकाणी 18 ते 20 मे या कालावधीत दाखल होत असते. यंदा हवामान खात्याने मोसमी पाऊस रविवारी म्हणजेच पाच दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात 'असनी' चक्रीवादळ कमी होताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे लगेच पुढे सरकले आहे त्यामुळे या वर्षी 15 मेलाच मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात व अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
हे नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये साधारण 20 ते 26 मे पर्यंत दाखल होतील असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण पुढील काही दिवस असेच असेल. मुंबईतील तापमान साधारण 34.5 व किमान 28.2 इतके नोंदवले गेले आहे.