Kerala: कोची मॉलमध्ये बुरखा घालून महिलांच्या वॉशरूममध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला अटक.
X
केरळच्या कोची शहरात मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एका २३ वर्षाच्या एका मुलाला पोलिसांनी अटक केली कारण तो महिलांच्या स्वच्छतागृहात गुप्तपणे व्हिडिओ चित्रित करताना पकडला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोचीमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये ही घटना घडली, जेव्हा कोचीमध्ये काम करणारा रोबोटिक्स इंजिनीर अभिमन्यू हा महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा (हिजाब) घालून महिला म्हणून पोज देताना व्हिडिओ काढताना पकडला गेला. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मॉलमधील महिलांच्या वॉशरूम मध्ये घुसला, त्याचा फोन एका बॉक्समध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ठेवला.त्याच्या संशयास्पद आणि भडक वर्तनाची दखल घेत, मॉलच्या सुरक्षा कर्मचार्यांनी पोलिसांना कळवले आणि त्यांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून आरोपीची चौकशी केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांनी सांगितले की, त्याने एका महिलेचा वेश धारण केला होता आणि तो वॉशरूममधील दृश्ये त्याच्या मोबाइल फोनवर रेकॉर्ड करत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीचा बुरखा आणि मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.