Home > News > तुमका माहितीय का ? ठाण्यामधी मालवणी जत्रा भरलेली असा ...

तुमका माहितीय का ? ठाण्यामधी मालवणी जत्रा भरलेली असा ...

तुमका माहितीय का ? ठाण्यामधी मालवणी जत्रा भरलेली असा ...
X

मुंबईत अनेक महोत्सव सुरु झाले आहेत . कोकणी महोत्सव ,माणदेशी महोत्सव तसेच आता मालवणी महोत्सव सुद्धा भरला आहे .मुंबईत कोकणी लोकांचं असणारी लोकसंख्या पाहता ,या महोत्सवांना प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.कोणी भाषा ,तिथली संस्कृती ,खाण्याचे मालवणी पदार्थ हे पाहण्यासाठी अनेक मुंबईकर या महोत्सवांना भेट देताना दिसत आहेत .

ठाण्यातील शिवाईनगर येथे "उन्नती मैदान " येथे १३ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत दहा दिवस भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे.सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या "२४ व्या"मालवणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार दरेकर यांच्या हस्ते झाले.कोकणी उत्पादनांना मुंबई-ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातुन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार व मुंबई बँक अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी केले आहे .

मालवणी महोत्सवात येऊन कसा वाटला ? असा प्रश्न आ. दरेकर यांना करताच त्यांनी, 'बरा वाटला ' असा मालवणी भाषेत संवाद साधुन अधिक मालवणी भाषा येत नसल्याचे नमुद केले.मालवणी महोत्सवा बददल माहिती देताना, सीताराम राणे यांनी ठाणे, मुंबईकरांनी एकदा तरी येऊन लज्जतदार मालवणी खाद्य पदार्थाची चव घ्यावी. असे आवाहन केले आहे.ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात, या वर्षी हा उत्सव थोडासा उशिरा सुरू असला तरी मात्र तोच उत्साह आहे. या ठिकाणीं मांसाहार बरोबर शाकाहारी पदार्थाची चव चाखता येणार आहे. त्यामूळे ठाणेकरांनी एकदा तरी मालवणी उत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक

Updated : 14 Jan 2023 11:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top