पहिली ते सातवी शाळा होणार सुरु
X
कोरोनामुळे गेले पावणे दोन वर्ष बंद असलेल्या शाळा आता पूर्णपणे सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पाचवीपासूनचे वर्ग आधीच सुरू करण्यात होते. त्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्गसुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आता पूर्णपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातली नियमावली प्रशासन लवकरच जाहीर करणाऱ आहे.
राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा -कॉलेज सुरू झाले होते. त्यानंतर ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंत, तसेच शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्याचा विचार सुरू होता. तसेच त्यासंदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती, त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिची वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलं लहान असता. त्यामुळे कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे न संपल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी शाळांवर असणार आहे. शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.