महानंद डेअरी ; प्रिया मिटके यांचा आमरण उपोषणाचा इशारा
X
महानंद डेअरीची आर्थिक स्थिती वाईट असून, अजूनही कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे प्रिया मिटके यांनी 11 डिसेंबरला 6 दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन सर्व मागण्या मान्य करून एका महिन्यात कर्मचाऱ्यांचा पगार आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी देखील मान्य झाली.
पण दोन महिने उलटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही या संतापातून प्रिया मिटके यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा देऊन महानंद डेअरीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रिया मिटके यांनी पत्र लिहिले आहे.
प्रिया मिटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पुढील काही मागण्या ही केल्या आहेत. प्रिया मिटके यांनी महानंद दुग्धशाळेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उद्दभवलेल्या समस्यांमुळे दूध महासंघ चालविण्यास असमर्थ ठरलेले संचालक मंडळ बरखास्त करुन दूध महासंघाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमावा या मागणीसह
दूध महासंघ पूर्णपणे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड (एनडीबीबी) यांच्याकडे चालविण्यास द्यावा.
कर्मचाऱ्यांचे मागील ६ महिन्यांचे थकीत वेतन, फरकासह दोन वार्षिक वेतनवाढ, शासनाने जाहीर केलेले महागाई भत्ते फरकासह लवकरात लवकर द्यावे.
स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या ५७० कर्मचाऱ्यांना लागणारा निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावा.
या ४ मागण्या केल्या असून मान्य नाही झाल्या तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा प्रिया मिटके यांनी दिला आहे. महानंद डेअरीची आर्थिक परिस्थिति सुधारावी यासाठी शासन मागण्या मान्य करेल का हा प्रश्न चिन्ह आहे.