Home > News > मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; अत्याचार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; अत्याचार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

मेहबूब शेख प्रकरनात पोलिसांनी दिलेला बी-समरी अहवाल सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी योग्य ते पुरावे जोडलेले नसल्याने रद्द केला.

मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; अत्याचार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश
X

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात पोलिसांनी दिलेला 'बी-समरी' अहवाल हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सचिन नेहरकर यांनी फेटाळला आहे. मेहबूब शेख यांच्या विरोधात 28 डिसेंबर रोजी औरंगाबादच्या सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 वर्षीय पीडितेने हा गुन्हा दाखल केला होता. ती औरंगाबाद शहरात भाड्याच्या घरात राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेताना शेख यांनी कारमध्ये तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली व अत्याचार केला असल्याचे दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी बी-समरी अहवाल तयार केला होता. या अहवालात पोलीसांनी पिडीतेच्या आरोपात कसलही तथ्य नसल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दोघे कुठे भेटल्याचं दिसत नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

पोलीसांचा हा अहवाल आता न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात राजकीय दबावाखाली अधिकाऱ्यांनी तपास केला असल्याचे दिसत आहे. तपास आरोपीच्या म्हणण्यानुसार केला गेला असून ज्यांनी तक्रार केली आहे त्या तक्रारदाराला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत असल्यामुळे या प्रकरणात आता सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा आणि या तपासात पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या बी-समरी अहवालत सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी योग्य ते पुरावे जोडलेले नसल्याने तो अहवाल स्वीकारणे योग्य नसल्याचे म्हणत, हा अहवाल रद्द करावा, असे देखील न्यायालयात सांगितले.

काय आहे हे प्रकरण ?

औरंगाबाद शहरात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून मेहबूब इब्राहिम शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजेच्या च्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे. तरुणीने या संदर्भात औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक वार-पलटवार

भाजपने शेख यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने केली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली होती. मेहबूब यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत. 'जर एखादा सर्वसाधारण आरोपी असता तर तर त्याला लगेच अटक केली असती मग आता राजकीय पदाधिकाऱ्याला आणि विशेष म्हणजे सत्तेतील पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याला वेगळा न्याय का? शिवछत्रपतींचा महाराष्ट्र फक्त बोलण्यात नको तर आचरणातही हवा ' अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर दोघांच्यात शाब्दिक वार-पलटवार चालूच होते.

सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या व खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून दररोज कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. कालच एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यापूर्वी साकिनाका या ठिकाणी महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घातले गेले यात त्या महिलेचा मृत्यू झाला. पुण्यात देखील एका मुलीवर 14 लोकांनी सामूहिक बलात्कार केला होता. आशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेचा प्रश उपस्थित झाला आहे. अशा वेळीच मेहबूब शेख यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.

Updated : 24 Sept 2021 12:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top