Home > News > सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून माधवी बुच यांची नियुक्ती

सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून माधवी बुच यांची नियुक्ती

माधवी पुरी बुच यांची सिक्युरिटी अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. सेबी ही भारतीय बाजारपेठेतील भांडवल गुंतवणूकीची देखरेख आणि नियमन करणारी संस्था आहे. सेबीच्या प्रमुख पदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून माधवी बुच यांची नियुक्ती
X

सरकारने माधवी पुरी बुच यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सेबीच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. बुच यांच्यापुर्वी अध्यक्ष म्हणून अजय त्यागी हे पदभार सांभाळत होते. त्यागी त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर आता सरकारने माधवी पुरी बुच यांची नियुक्ती केली आहे. बुच यांच्या नियुक्तीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे.

बुच यांनी यापूर्वी सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणूनही काम केले आहे. याआधी त्या चीनमधील शांघाय येथील न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सल्लागार होत्या. त्यांनी खाजगी इक्विटी फर्म ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलच्या सिंगापूर कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. बुच यांचा ICICI समूहामध्ये दीर्घकाळ कार्यरत होत्या. त्यांनी ICICI सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि ICICI बँकेच्या बोर्डावर कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे. सेंट स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर, बुच यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Updated : 28 Feb 2022 6:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top