Home > News > "चश्मा लावून पाहा!" सोनालीचं लग्नावरच्या सवालावर बेधडक उत्तर

"चश्मा लावून पाहा!" सोनालीचं लग्नावरच्या सवालावर बेधडक उत्तर

चश्मा लावून पाहा! सोनालीचं लग्नावरच्या सवालावर बेधडक उत्तर
X

आली रे आली अप्सरा पुनः चर्चेत आली.. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले असून, काही महिन्यांपूर्वी, तिने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि तिथल्या तिच्या कामाची प्रशंसा केली. आता ती तिच्या आगामी 'मुगल मर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे, सोनाली कुलकर्णीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत काय म्हणाली आहे जाणून घेऊया या व्हीडीओच्या माध्यमातून.

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी सोनाली कायमच चर्चेत असते. 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'नटरंग', 'मितवा', 'क्लासमेट्स', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' हे सोनालीचे काही गाजलेले चित्रपट. सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सोनालीने नुकतेच तिच्या कुटुंबात झालेल्या एका लग्न समारंभाला हजेरी लावली असून काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओंमध्ये तिचे संपूर्ण कुटुंब दिसून आले. निळ्या रंगाची पैठणी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये सोनाली सुंदर दिसत होती. यानंतर, तिने पारंपारिक नाकाची अंगठी घालताना कसे खावे याचे प्रात्यक्षिक देणारा व्हिडिओ पोस्ट केला असून, 'नाक नाही तर असे दिसते' असे या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे

हा व्हिडीओ पाहून एका चाहत्याने सोनालीच्या लग्नाच्या स्टेटसवर कमेंट करत म्हटलं आहे की, या फोटोवर एका नेटकऱ्याने तिच्या लग्नावरुन कमेंट केली आहे. "लग्न झालं नाही का अजून वय लय दिसू लागलं", अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर सोनालीने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. "काका मंगळसूत्र दिसत नाहीये का ? चश्मा लावून पाहा", असे सोनाली कुलकर्णीने उत्तर दिले आहे. सोनालीच्या या उत्तराचे अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर 7 मे 2021 रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले. सोनाली आणि कुणाल यांनी 7 मे 2021 मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणालचा विवाह पार पडला होता. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी म्हणजेच 7 मे 2022 रोजी सोनाली आणि कुणालने थाटामाटात लग्नगाठ बांधली. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

Updated : 8 April 2024 1:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top