लॉकडाउनचा फटका : टोपल्या विकणाऱ्या महिलेचं बजेट कोलमडलं
X
पारंपरिक पद्धतीने बांबू पासून बनवलेल्या टोपल्या आत्ता कमी विकल्या जात आहेत. त्यातही जेव्हापासून प्लास्टिक आलं आहे तेव्हापासून बांबूच्या टोपल्या खरेदी करण्यांचं प्रमाण कमी झालं आहे. हे काम करणाऱ्या मंगला बुरुड यांना लॉकडाऊन काळात घर चालवणं काठीन झालं होतं त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च.. या सगळ्यांसाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हा खरा प्रश्न होता.
त्यांनी कर्ज काढून मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेतला शाळेची फी भरली पण ऑनलाइन शिक्षणाचा तितकासा फायदा त्यांना दिसत नाही. "त्यापेक्षा मुलांना एक वर्ष घरी बसवलं तर ठीक होईल." असं मंगला सांनी सांगीतलं.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन चा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यात जे पारंपरिक पद्धतीने काम करणारे लहान व्यावसायिक आहेत त्यांना याच्या जास्त झळा पोहोचल्या आहेत. पहा आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...