त्या दोघी आधी समलैंगिक झाल्या, मग वाद झाले आणि प्रकरण थेट पोलिसांत गेलं
औरंगाबादेत समलैंगिक जोडप्यातली भांडण इतके वाढले की थेट पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला
X
औरंगाबाद क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या परिसरात दोन समलैंगिक मुलींचे प्रेम हे गेल्या दोन-तीन वर्षापासून भारत होते. दोघी एकाच वसाहतीमध्ये होत्या त्यामुळे एकमेकींच्या घरी येणे-जाणे सुरू होते. मैत्री घट्ट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस, विसाव्या वर्षात दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये प्रेम बहरले. आनंदाने नाते फुलतही गेले. मात्र, काही महिन्यांनी एकीला हे नाते नकोसे झाले. तसे तिने साथीदाराला सांगितलेही. मात्र, तिला अचानक आलेले हे वळण मान्य नव्हते. मग नाते विकोपाला गेले. दोघींमधील वितुष्ट एवढे वाढले की नाते कायम राखण्यासाठी आत्महत्येची, दोघींची विशिष्ट छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. मग हे जोडपं थेट क्रांती चौक पोलिस ठाण्यात पोहोचलं. सोमवारी रात्री पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींच्याही कुटुंबाला बोलावून कुटुंबासमोर समजूत घालून हमी घेत हे प्रकरण पोलिसांनी सोडवलं