कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? 'आप'च्या प्रीती मेनन यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
X
पंजाबमध्ये सत्ता आणि गोव्यामध्ये दोन आमदार निवडून आल्यानंतर आम आदमी पक्ष येत्या महापालिका निवडणूकीत उतरू पाहतंय. या पार्श्वभुमीवर 'आप'च्या प्रीती मेनन यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर टीका करायला सुरूवात केली आहे.
जेव्हा आम आदमी ने दिल्ली मध्ये सरकार बनवून चांगल्या मताने जिंकून आले, खुप लोकांना शंका होती, आम्ही एका राज्यातील पक्ष आहे. गोवा मध्ये सुद्धा दोन आमदारजिंकून आले. सगळ्या पार्टी ने प्रयत्न केला पण जिंकून आले नाही, डिपॉजीट जप्त झाले. गोव्याचे आमदार आणि पंजाब चा विजय या वरुन सिद्ध झालाय, आम आदमी पार्टी एक नेशनल पार्टी आहे. कामाच्या राजनीती गरज मुंबई ला आहे. बी. एम. सी. भ्रष्टाचारात गुंतलेली आहे. एकोणपन्नास हज़ार करोड चा बजेट आहे, पण रस्त्या च्या खड्डयात ती बुडून जाते. सगळे लोक, सरकार या भ्रष्टाचारात शामिल आहेत. या वर एकच उपाय, एक संधी 'आप'ला, एक संधी केजरीवाल ला. हे महाराष्ट्रचे दुर्दव्य आहे कि, आमचे राजभवन डिस्ट्रनेशन सारखे वापरले जात आहे.एक खोटी अवार्ड सेरेमनी करण्यात आली, जी खोट्या पी. एच. डी. डिग्री घेतलेल्या लोकांना दिली.सर्व ज्ञानी कुलपती राज्यपालांच्या अधिपत्याखाली असतात. ह्या सगळ्या गोष्टी ची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी यांची कोणाशी आहे कि नाही आहे? असे असतात मोदी सरकारचे राज्यपाल कि राजभवनला इवेंट कंपनी सारखे वापरतात. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अशी प्रतिक्रिया प्रिती शर्मा यांनी यावेळी दिली.