Home > News > NCB चे संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ पत्नी क्रांती रेडकर आली पुढे

NCB चे संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ पत्नी क्रांती रेडकर आली पुढे

NCB चे संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ पत्नी क्रांती रेडकर आली पुढे
X

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या बरेच चर्चेत आहेत. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेपासून समीर वानखेडेंची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, समीर यांनी नुकतीच त्यांच्यावर नजर ठेवल्याचा आरोप केला, तेव्हा महाराष्ट्रातील काही नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) त्यांच्या समर्थनासाठी पुढे आली आहे.

समीर वानखेडे नक्की कोणाच्या देखरेखीखाली आपले काम करतात , म्हणजे त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे याबाबत ईटाइम्सशी बोलताना समीर वानखेडे पत्नी क्रांती म्हणाली की, समीर कोणत्याही प्रकारचे दडपण हाताळण्यात खूप चांगले आहेत. जगातील विविध प्रकारचे नेते वाचत ते मोठे झाले आहेत. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे देखील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. जर काही अडचण असेल किंवा ते निर्णयापर्यंत पोहोचू शकत नसतील, तर ते त्यांच्या वडिलांकडे जातात, जे त्यांच्या कारकिर्दीत त्याच्यासाठी मार्गदर्शक प्रकाशासारखे आहेत असं क्रांतीने म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासापासून समीर वानखेडे बॉलिवूड सेलेब्ससाठी मानबिंदू राहिले आहेत. बॉलिवूड कलाकार समीर वानखेडे यांच्या निशाण्यावर येण्याची ही पहिली वेळ नाही. 2007 मध्ये, जेव्हा समीर वानखेडे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून तैनात होते, तेव्हा त्यांनी खात्री केली की कोणताही चित्रपट कलाकार त्यांचे सामान तपासल्याशिवाय विमानतळ सोडू शकत नाही.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Updated : 13 Oct 2021 6:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top