शैजाला आपल्या मिशांचा वाटतो अभिमान..
X
मिशा-दाढीवाली बाई... ही टिप्पणी ऐकून कोणत्याही महिलेला विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. पण केरळ मध्ये एक महिला आहे ज्यांना अशा कमेंट्स अजिबात विचित्र वाटत नाहीत. आपण महिला असून मिशा आहेत याची त्यांना ना कसली लाज वाटते ना लोक काय म्हणतील याची पर्वा. तर आता आपण अशाच केरळ मधील शैजा या बिनधास्त व डॅशिंग महिले विषयी जाणून घेणार आहेत. शैजाने आपल्या चेहऱ्यावर वाढणारे केस आपल्या आयुष्याचा भाग बनवले आणि जगात आपला ठसा उमटवला.
शैजाला तिच्या मिशा खूप आवडतात..
शैजा (३५ वर्षे) ही केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील आहे. कोणी तिच्या कुरळ्या मिशांची खिल्ली उडवत तर कुणी तिच्या दिसण्याची. काहींना आश्चर्य वाटेल. पण या सगळ्या कमेंट्सची तिला पर्वा नाही, असे शैजा म्हणते. तिने तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर मिशी असलेला स्वतःचा फोटो शेअर करत केला व स्वतःच्या मिशा खूप आवडतात असं म्हंटल त्यानंतर तिचे हे फोटो समाजमाध्यमानवर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी तिचे कौतुक केले तर अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. तिला लोकांकडून वारंवार "तुला मिशा का आहेत?" असं विचारलं जात पण या सगळ्या लोकांना शेजा एकच उत्तर देते "मला मिशा आवडतात"
एका महिलेला मिश्या कश्या? असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल
बर्याच स्त्रियांप्रमाणे, तिचे पूर्वी नाकाखाली हलके केस होते. शैझा अनेकदा तिच्या भुव्यांच्या केसांना थ्रेडिंग करून ग्रूम करायची पण तिच्या वरच्या ओठावरील केस काढण्याचा विचार तिने कधीच केला नव्हता, असे ती म्हणते. पण तिचे केस अचानक जाड मिशात बदलू लागले. मग शैलजाने ठरवलं आता आपण मिशा ठेवायच्या आणि तिने मागच्या ५ वर्षांपूर्वी अगदी पुरुषांप्रमाणे मिशा ठेवल्या.
अनेकांनी शैजाला मिशा काढण्याचा सल्ला दिला पण..
एक स्त्री म्हंटल की, आपल्या डोळ्यासमोर नाजूक नाक, ओठ, लांबलचक केस असं वर्णन येते आधीच कुठल्या महिलेला मिश्या असलेलं आपल्या डोळ्यासमोर येत नाही. काही महिलांना नाकाखाली हलके केस असतील तरी त्या त्यावर लाखो रुपये खर्चून वारंवार पार्लरमध्ये जाऊन नाकाखालच्या केसांमुळे आपले सौन्दर्य कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. पण शैजा मात्र काही औरच आहे. तिला मिशा महिलांचे सौन्दर्य कमी करतात असं अजिबात वाटत नाही. ती म्हणते की, "मला वाटत नाही की मिशा किंवा कशाचाही माझ्या सौंदर्यावर परिणाम होतो,"