केरळची पहिली आदिवासी हवाईसुंदरी...गोपिका गोविंद
X
लहानपणापासून प्रत्येकजण काहींना काही स्वप्न पाहत असतो .पण मोठं होईपर्यंत ते जपणं प्रत्येकाला जमत नाही.पण काही व्यक्ती स्वप्न शेवटपर्यंत सोडत नाहीत.केरळमधील अशाच एका मुलीने लहानपणी हवाईसुंदरी होण्याचं स्वप्न पाहिलं. गोपिका गोविंद तिचं नाव. हवाईसुंदरी तर खूप आहेत पण ही केरळमधील पहिली आदिवासी महिला आहे जी हवाईसुंदरी बनली आहे.
गोपिका या यशातून संपूर्ण महिलावर्गाला सकारात्मक संदेश देत आहे.
केरळची पहिली आदिवासी हवाई सुंदरी
गोपिकाचा जन्म केरळमधील छोट्याशा गावात झाला आहे.1998 मद्ये जन्मलेली गोपिका अनुसूचित जमाती वर्गात करीमबाला समुदायात मोडते.आर्थिक परिस्थिती गरीब त्यामुळे तिचं बालपण गरिबीत आणि वंचिततेत गेलं .तरीही तिच्या आईवडिलांच्या श्रमामुळे ती नेहमी शिकत गेली.बहुतेक आदिवासी मुली जगतात तसंच आयुष्य ती जगली होती,पण लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कसोशीने प्रयत्न केला.
घरावरून विमान गेलं की विमानात बसण्याची स्वप्न रंगवणारी गोपिका
एका आदिवासी समजातील मुलीने हवाईसुंदरी होण्याचं स्वप्न पाहणं याहून सुंदर गोष्ट अजून काय असू शकते?ज्यावेळी तिने हे स्वप्न पाहिलं तेंव्हा ती आठवीत शिकत होती.आकाशातील उडणारे विमान पाहून तिला खूप उत्साही वाटायचं .लहानपणापासून त्या विमानामधून प्रवास करण्याची तिची स्वप्न तिने जिद्दीने पूर्ण केली.तिने आठवीपासूनच या क्षेत्रातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.या अभ्यासक्रमासाठी खूप पैसा लागेल,असं समजल्यानंतर तिने स्वप्न सोडण्याचा निर्णय सुद्धा काही क्षणांसाठी घेतला होता.पण त्यावेळी केरळमध्ये अनुसूचित जातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान दिले जाते हे तिला कळले. तिने पुन्हा सुरुवात केली .एम एस सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने IATA मधून डिप्लोमा केला आणि ड्रीम स्काय एव्हीएशन ट्रेनिंग अकादमी मध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला.आता तिची निवड झाली आहे.लवकरच ती एअर इंडिया एक्सप्रेस जॉईन करणार आहे.
गोपिका तिच्या समुदायातील स्त्रीयांसाठी आदर्श तर बनलीच पण सर्वांसाठी सुद्धा एक चांगला सकारात्मक संदेश तिने दिला आहे.इच्छा असेल तर मार्ग निघतोच.