करुणा शर्मां यांना अखेर जामिन मंजूर...!
करुणा शर्मां यांना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत परळी,अंबाजोगाई येथे येण्यास बंदी...
X
अखेर करुणा शर्मा आणि त्यांचे ड्रायव्हर अरुण मोरे यांना यांच्या जामिन मंजूर. काल त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सूनवणीवर कोर्टाने निकाल दिला असून शर्मा यांना 16 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांचा जामीन मंजूर केला आहे. तर दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीडच्या परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती . त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून फिर्यादी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून, करुणा शर्मासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर परळी शहर पोलीस ठाण्यात, गु.र.न 142-2021 कलम 307,323,504,506,34,3 (1)(r),3(1),3(2) सह ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती . तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती . जामिनासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता.
त्यांच्या जामिनावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. न्यायाधिश एस.एस.सापटनेकर यांच्यासमोर दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला. करुणा शर्मा या मागील पंधरा दिवसांपासून बीडच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांचा 16 वा दिवस आहे. त्यावैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान करुणा शर्मा यांना 16 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले असून या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.