Home > News > करुणा मुंडे यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत खातं उघडलं..

करुणा मुंडे यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत खातं उघडलं..

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांनी आपले खातं उघडलं असून या निवडणुकीत त्या किती मते जिंकणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

करुणा मुंडे यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत खातं उघडलं..
X

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. महाविकासआघाडीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदार आज कोणाला कौल देणार याकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सगळ्यांमध्ये एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचं. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा मुंडे यादेखील निवडणूक लढवत आहेत. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये आता करुणा मुंडे यांनी आपलं खातं उघडलं आहे. तर करुणा मुंडे (Karuna Munde)कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत किती मत जिंकणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज भरत असताना करून मुंडे यांनी माझ्याकडे इतकी ताकद आहे तर मग २०२४ ला का निवडणुक लढवू शकत नाही. त्यामुळे २०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध, करुणा धनंजय मुंडे अशी लढत १०० टक्के होणार आहे, असे आव्हानच त्यांनी दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. आता या निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांना किती मतं मिळणार हे येत्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल. सध्या त्यांना सातव्या फेरीअखेर 24 इतकी मते मिळाली आहेत.

कसं झालं आहे मतदान..

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 पुरुष व 1 लाख 46 हजार 068 महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी 12 व सैन्यदलात 95 इतके मतदार आहेत. या मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापैकी 64.49% पुरुषांनी तर एकूण महिलांच्या मतदानापैकी 57.89 टक्के महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

कोण 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

'हे' 15 उमेदवार होते रिंगणात :

जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात)

सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ)

यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी)

विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा)

शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर)

सुभाष देसाई (चिन्ह - सोड रोलर)

बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर)

भारत भोसले (चिन्ह - कपाट)

मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन)

अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड)

अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर)

करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र)

राजेश नाईक (चिन्ह - किटली)

राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी)

संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद)

Updated : 16 April 2022 10:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top