कराळे मास्तर करोडपती होणार?
X
नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तर हे नाव आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचले आहे. कराळे मास्तर यांची ती भन्नाट वऱ्हाडी भाषा अनेकांना लगेच आपलंसं करून टाकते. ते वर्धा या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस देखील घेतात. "अरे पोट्टेहो..." असा आवाज आला की आता आपल्याला समजतं करावे मास्तर यांचा तास सुरू झाला. कराळे मास्तरांना शिक्षक किंवा गुरुजी म्हणून कोणीच ओळखत नाही. तर त्यांची मास्तर म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. समाज माध्यमांवर या कराळे मास्तरांची एक वेगळीच हवा आहे.
हीच कराळे मास्तर यांची हवा आता थेट 'कोण होणार करोडपती' पर्यंत पोहोचली आहे. कराळे मास्तर आता हॉट सीटवर बसणार आहेत. अफलातून ज्ञान असलेल्या कराळे मास्तर आता कोण होणार करोडपती मधून किती रुपये जिंकून जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. येत्या शनिवारी कराळे मास्तर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता पोट्टे हो.. असं म्हणत मुलांना प्रश्न विचारणाऱ्या कराळे मास्तरांनाच प्रश्न उत्तरांना सामोरे जावे लागणार आहे. हा भाग पाण्यासाठी आता महाराष्ट्रातील जनता आतुर झाली आहे.