"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"
X
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गोष्टीचा प्रत्यय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला. या लग्नात मुस्लिम समाजाच्या मामाने दोन हिंदू भाचींचे कन्यादान केले. त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात हे धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाची चर्चा शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.
सविता भुसारी या दरवर्षी पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात त्यांनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली. भुसारी कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली. तर धाकटी सावरी हिची बारावी झाली दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तिथेही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न लावून दिले.
दरम्यान, हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसंच अनेकजण या सामाजिक एकतेचे उदाहरण असलेल्या फोटोवर आपली भावना देखील व्यक्त करत आहेत.