Home > News > कंगनाचं ऋतिकवर एकतर्फी प्रेम - अर्णब गोस्वामी

कंगनाचं ऋतिकवर एकतर्फी प्रेम - अर्णब गोस्वामी

अर्णबने कंगना-ऋतिकच्या वादावर घेतलेल्या मुलाखतीच्या तासभर आधी केलेल्या व्हाट्सअप चॅटमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे.

कंगनाचं ऋतिकवर एकतर्फी प्रेम - अर्णब गोस्वामी
X

रिपब्लिक वृत्तवाहीनीचा संपादक अर्णब गोस्वामी गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या वादाचा केंद्र बिंदू ठरताना दिसत आहेत. टिआरपी घोटाळ्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक आणि सुटका झाल्यानंतर आता अर्णबचे व्हाट्सअप चॅट व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या ५०० पानांच्या चॅटमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत.

व्हायरल झालेल्या अर्णबच्या चॅट्स मधून त्याचं भाजप कनेक्शन उघड झालं आहेच, पण त्याच बरोबरीने त्याने कंगना आणि ऋतिक बद्दल केलेली चॅटही समोर आली आहे. समोर आलेल्या चॅटनुसार कंगना ही ऋतिकसोबत शारिरीक संबधात होती, आणि तिचं ऋतिकवर एकतर्फी प्रेम होतं असं अर्णबने म्हटलं आहे.

कंगना आणि ऋतिकचा वाद झाल्यानंतर अर्णबने ऋतिकची या वादावर मुलाखत घेतली होती. या मुलाखतीच्या एक तास आधी त्याने ही चॅट केली आहे. ही चॅट बाहेर आल्यामुळे अर्णबच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.


Updated : 16 Jan 2021 6:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top