Home > News > भारताची जोया अमेरिकेच्या म्युझियममध्ये

भारताची जोया अमेरिकेच्या म्युझियममध्ये

भारताची जोया अमेरिकेच्या म्युझियममध्ये
X

जोया अग्रवाल या पहिल्या महिला भारतीय पायलट आहेत ज्यांनी अमेरिकेच्या सेंट फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियम मध्ये स्थान मिळवले आहे . त्यांनी उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेतले होते आणि सोळा हजार किलोमीटर एवढे विक्रमी अंतर पार केले.

एअरक्राफ्ट बोईंग ७७७ च्या वरिष्ठ पायलट जोया अग्रवाल यांनी त्यांच्या क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.या म्युझियममध्ये स्थान मिळवल्यासंदर्भात जोया यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हा गौरव आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून मी त्या संग्रहालयात स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे याचा अभिमान वाटत असल्याचे त्याचबरोबर आश्चर्य वाटत असल्याचं त्या बोलल्या आहेत . विमानांशी संबंधित अमेरिकेतील एका प्रतिष्ठीत संग्रहालयाचा मी एक हिस्सा झाले आहे ही गोष्ट खरोखरच आनंदाची आहे ,अशी ही प्रतिक्रिया जोया यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना दिली आहे.

2021 मध्ये त्यांनी एका मोहिमेचे नेतृत्वही केले होते.जोया या पहिल्या महिला भारतीय पायलट आहेत ज्यांनी उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेतले होते आणि 16 हजार किलोमीटर एवढे विक्रमी अंतर पार केले. या अंतर्गत त्यांच्यासोबत असणाऱ्या टीम मध्ये महिला पायलट होत्या त्यांनी अमेरिकेतील सेंट फ्रान्सिस्को येथून ते भारतातील बेंगलोर हा जगातील सगळ्यात मोठा एअर रूट यशस्वी पार केला होता.अत्यंत धाडसी असे हे उड्डाण असून त्याबद्दलच त्यांच्या कामगिरीचा गौरव अमेरिकेच्या म्युझियम द्वारे करण्यात आला आहे. जोया यांचे हे यशस्वी उड्डाण संपूर्ण जगातील महिलांसाठी एक प्रेरणा देणारा आहे.महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने ते एक मोठे पाऊल आहे अशा शब्दात सेंट फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियमद्वारे त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

जोया अग्रवाल या मे 2004 पासून एअर इंडिया मध्ये पायलट या पदावर कार्यरत आहेत. 2013 मध्ये त्या एअर इंडियाच्या बोईंगसाठी विमान उडवणाऱ्या पहिल्या सर्वात तरुण महिला पायलट आहेत.


Updated : 22 Aug 2022 12:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top