आजपर्यंत 222 महिलांच्या जटांना काञी लावणाऱ्या नंदिनी जाधव…
X
अनेक महिला डोक्यावर जट घेऊन फिरताना दिसतात. खरतर केसांची निगा व्यवस्थित राखली नाही. केसांना वेणी-फणी केली नाही तर मग महिलांच्या केसात अशा प्रकारच्या जटा निर्माण होतात. एखाद्या महिलेच्या डोक्यात अशा प्रकारची जट झाल्याच दिसल्यास संपूर्ण समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आजही याबाबत लोकांच्या मनात खूप अंधश्रद्धा आहेत. अनेक उच्चशिक्षित लोक देखील अशा अंधश्रद्धेला बळी पडतात.
पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत नंदिनी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत जनजागृती करत ही अंधश्रद्धा आहे आणि जट होण्यामागे नक्की शास्त्रीय करणे काय आहेत हे लोकांना समजावून सांगत आहेत. फक्त जनजागृतीचा नाही तर त्यांनी आज पर्यंत पुणे जिल्यात 222 महिलांना जटेतून मुक्तता मिळवून दिली आहे.
आजच त्यांनी रेखा उपाध्ये या पुणे जिल्यातील धायरी येथे राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेच्या केसात झालेल्या जट कापून त्यांना शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्त केलं. याबाबत नंदिनी जाधव यांनी फेसबुक वरती एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की, रेखा उपाध्ये या साठ वर्षीय महिलेच्या केसात गेल्या चार महिन्यापूर्वी जट झाली होती. त्यामुळे त्यांना शारीरिक मानसिक त्रास होत असल्यामुळे त्यांनी जट काढण्याची विनंती केली व आज जट निर्मूलन करताना डाॅ.नितीन हांडे तसेच रेखाताईची बहिण व त्यांचे पती उपस्थित असल्याचं नंदिनी जाधव यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटल आहे.