Home > News > 'हिजाब वादामागे इस्लामिक संघटनेचा हात'' कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप..

'हिजाब वादामागे इस्लामिक संघटनेचा हात'' कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप..

हिजाब वादामागे इस्लामिक संघटनेचा हात कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांचा आरोप..
X

'कर्नाटकमधील हिजाब वादामागे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या इस्लामिक संघटनेची शाखा असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचे मी उघडपणे सांगतो. असा आरोप कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी केला आहे. बीसी नागेश हे नेहमीच त्यांच्या वदग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. हिजाब प्रकरणावरून त्यांनी पहिला या घटने मागे काही अदृश्य हात आहेत असं म्हंटल होतं तर आता त्यांनी थेट हिजाब प्रकरण भडकवण्यामागे इस्लामिक संघटनेची शाखा असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचा आरोप केला आहे. एक खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

या सगळ्याचे पुरावेही आम्हाला मिळाले असून त्या संघटनेच्या चिथावणीचा परिणाम म्हणून काही मुलींनी हिजाबसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. यापूर्वी अशी मागणी होत नव्हती. हा सर्व गदारोळ अचानक झाला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

Updated : 10 Feb 2022 3:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top