Home > News > International Womens Day:: हीरो मोटोकॉर्प ने दिल्ली महिला पोलिसांना दिल्या 215 स्कूटर

International Womens Day:: हीरो मोटोकॉर्प ने दिल्ली महिला पोलिसांना दिल्या 215 स्कूटर

International Womens Day:: हीरो मोटोकॉर्प ने दिल्ली महिला पोलिसांना दिल्या 215 स्कूटर
X

Hero Moto Corp ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात दिल्ली पोलीस विभागाला 215 Pleasure 110 cc स्कूटर सुपूर्द केल्या आहेत. Hero MotoCorp ही मोटारसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने सुरक्षिततेसाठी आपली अतुट बांधिलकी कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

महिला पोलिसांना दिलेल्या या गाड्यांमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्लॅटफॉर्म Hero WeCare अंतर्गत लॉन्च केलेल्या या स्कूटरमध्ये सायरन, ट्रॅफिक लाइट्स आणि सार्वजनिक घोषणा करण्यासाठी (PA) सिस्टम आणि पोलिसांना आवश्यक असलेली इतर उपकरणे आहेत.

प्लेजर स्कूटरचा वापर महिला पोलीस अधिकाऱ्यांना शहरात सक्रिय गस्त घालण्यासाठी आणि दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी करता येणार आहे.

हिरो मोटोकॉर्पचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे प्रमुख भारतेंदू काबी यांनी सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात दिल्ली पोलिस आयुक्त राकेश अस्थाना, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि हिरो मोटोकॉर्पच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिल्ली पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना या स्कूटर सुपूर्द केल्या आहेत.





Updated : 8 March 2022 5:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top