International Day of Happiness - स्त्री सन्मान आणि आनंद: समतोल जीवनाची गरज !
X
हल्लीच्या काळात महिलांना समाजात सर्व अधिकार दिले जात आहे. कुटुंबातही स्त्री नोकरी करते, पैसा कमाविते म्हणुन तिला मानाचे स्थान दिले जाते पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सर्व अधिकार हक्क मिळाले आहे. हे सर्व ठीक आहे. पण स्त्रीला आनंद मिळतो आहे का. हे सर्व हक्क अधिकार मिळूनही महिलांना मानसिक समाधान मिळत आहे का. स्त्रियांचा मानसिक विकास होत आहे का हे लक्ष्यात घेणे फार महत्त्वाचे आहे स्त्रियांचे कामाचे तास कमी झाले. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या एवढे सगळे होऊनही स्त्री आनंदी जीवन जगत आहे का तिने कधी आनंदाने श्वास घेतला आहे का आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण आजही स्त्री स्वतंत्र आहे का. आज स्त्री चंद्रावर जाते मोठमोठे यश संपादन करते पण घराच्या उंबरठ्याबाहेर पाउल टाकण्यासाठी तिला परवानगी मागावी लागते. मग तिला स्वतंत्र म्हणता येईल का. त्यात शिक्षित आणि उच्च विचारधारा असणारे लोक परवानगी देतात. पण बुरसटलेल्या विचारांचे लोक आजही स्त्रीची उपेक्षाच करतात. ती कितीही मोठी बनली तरी शेवटी काय ती बाईच ना. तिने कसे जरा दुसर्यांच्या ताब्यातच रहायला पाहिजे ना. स्त्री कितीही शिकली डॉक्टर इंजिनीयर कलेक्टर होऊ द्या पण शेवटी काय ती बाईच ना तिला काय कळते. आपण सांगू तसच तिने वागले पाहिजे. अशा अनेक चर्चा होतात.
तिला मतदान करण्याचा हक्क मिळाला पण कुटुंबात समाजात मत मांडण्याचा अधिकार मिळालाच नाही. तो अधिकार मिळविण्यासाठी तिने आवाज काढला की समाज म्हणतो काय आघाव बाई आहे शिक्षणाचा नोकरीचा गर्व झाला तिला. शेवटी लोक बोट तिच्याकडेच दाखवतात बदनाम स्त्रीलाच केले जाते. स्त्रीला देवाने प्रेम वात्सल्य सहनशीलतेची मूर्ती बनवलेली असते ते गुण तिच्यात कुटून कुटून भरलेले असतात. कुटुंबाच्या प्रेमापोटी ती डॉक्टर इंजिनीयर कलेक्टर असू द्या दिवसभर ऑफिस काम करून संध्याकाळी कुटुंबाच्या सेवेत हजर होते. कुठेतरी मनात अपेक्षा करते कुणीतरी म्हणाव छान स्वयंपाक केला. थकली असशील ना. पण अपेक्षांची निरपेक्ष बोलणेच वाट्याला येते. मिळतो का तिला आनंद.आहे का तिला मानसिक समाधान. जोपर्यंत स्त्रीला कुटुंबात मानाचे स्थान दिले जात नाही तोपर्यंत स्त्रीला आनंद मिळू शकतं नाही. कुटुंबात मानाचे स्थान मिळाले की समाजात आपोआपच मानाचे स्थान मिळते.
आजही एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा त्या कुटुंबातील लोकांकडून इतकेच नाहीतर तिच्या जोडीदाराकडून सुद्धा तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. मग ती मुलगी शिकलेली असो किंवा अल्पशिक्षित असो..तू अशीच वागते .तू अशीच खाते. तू कशी चालते. तुला काही येतच नाही. हे तुला बिलकुल चांगले दिसत नाही..काय बधिर डोक्याची आहे. हिला काही कळतच नाही..असे बोलून बोलून तिच्या मानसिकतेचा पार ठेचा करून टाकतात. त्या मुलीला मात्र सगळे सोसावा लागते. कारण ती संस्कारी असते. आईवडिलांचे नाव कमवायचे असते. थोडा जरी विरोध केला तर नवर्याची आक्रमकता सोसावी लागते. अशा मूर्ख लोकाना हेच कळता नाही की ती मुलगी त्यांनीच निरखून पारखून पसंत करून आणलेली असते. परंतु ही आपल्यापेक्षा पुढे जाईल आपल्यापेक्षा वरचढ होईल या कल्पनेने त्या मुलीचे मानसिक शारीरिक खच्चीकरण केले जाते. पुरुषप्रधान संस्कृतीचे पारडे उंच ठेवण्यासाठी त्या मुलीचे मानसिक शारीरिक शोषण केले जाते. असे असेल तर आपल्या देशात कौटुंबिक पातळीवर अजूनही स्त्री पुरुष समानता झालेली नाही महिलांना कुटुंबात आजही खालच्या दर्जाची वागणूक मिळते स्त्री पुरूष समानतेचा कायदा घरातून राबविला गेला पाहिजे. कुटुंब सुधारले की समाज सुधारेल आणि सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाचा आनंद सर्व महिला आनंदाने उपभोगतील.
महिलांना प्रेमाची, मानाची, आदराची वागणूक दिली तर ती महिला आनंदी राहून प्रेमाने सर्वांची सेवा करू शकेल. तिच्याकडे एक व्यक्ति म्हणुन बघितले पाहिजे तीदेखील देवाने बनवलेली हाडामासाची रचना आहे हे जाणले पाहीजे. तिलाही मन आहे हे समजून घेतले पाहिजे प्रत्येक महिलेला एक सुरक्षित आयुष्य जगून दिले पाहिजे. स्त्रीची मानसिक शारीरिक अवस्था जेव्हा सुरक्षित भक्कम आणि आनंदी असेल तेव्हाच ती आनंदी कुटुंब घडू शकेल सुदृढ आनंदी अपत्य निर्मिती करू शकेल. स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर तिचे शारीरिक आणि सामाजिक आरोग्य अवलंबून असते. स्त्रीचे मन प्रसन्न असेल तरच तिचे शरीर कार्यक्षम असते. तेव्हाच ती स्त्री कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवून आणू शकते. ज्याप्रमाणे एका मुलीला चहापासून पुरणपोळी पर्यंत स्वयंपाक करता आलाच पाहिजे हे शिकविले जाते त्याप्रमाणे प्रत्येक मुलाला हे शिकविले पाहिजे. की कुटुंबाच पोट भरेल ईतका पैसा कमावून आणायला हवा आणि स्वयंपाक शिजवता आलाच पाहिजे.
स्त्रियांनी देखील आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले पाहिजे म्हणजे हा समाज स्त्री स्वातंत्र्याला कधीही गालबोट लाऊ शकणार नाही. स्त्रियांनी स्वताचे जीवन स्वतंत्र रीतीने सुरक्षित सक्षम होऊन जगले पाहिजे. स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वताचे मन आणि शरीर यांची काळजी घेतली पाहिजे. आपले मन नेहमी प्रसन्न कसे राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. नियमित व्यायाम योगासने केली पाहिजे. निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेले पाहीजे. निरनिराळे छंद जोपासले पाहिजे. अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे. स्वताच करियर परिवार सांभाळून अध्यात्माशी जोडले गेले पाहिजे. मेडिटेशन करणे चालणे सायकल चालवणे या गोष्टी केल्या पाहीजे. महिलांनी स्वताच्या मानसिक शारीरिक आरोग्याबद्दल नेहमी जागरुक असायला हवे. आणि आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे.
आज सरकारने स्त्रियांना अनेक योजना उपलब्ध केल्या आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. सरकारकडून महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचा फायदा घेऊन सक्षम आणि स्वावलंबी झाले पाहिजे.
नारी तुम किसी का सहारा बने हुए हो,
किसी को उम्मीद देते हो.
तो नारी तुम शक्ति हो....
गिरे को उठाते हो,
हाथ पकडकर आगे बढाते हो,
तो नारी तुम करुणा हो,
ये सब खासीयत तुझ मे है तो नारी तुम लाजवाब हो....
-लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे