Home > News > छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...
X

मध्य रेल्वेच्या नॉन-फेअर महसूल उपक्रमांमुळे महसूल वाढते आणि प्रवाशांना आधुनिक सुविधाही मिळतात मध्य रेल्वेने नॉन फेअर रेव्हेन्यूच्या माध्यमातून नवीन उपक्रम आणले आहेत. याचा प्रवाशांना फायदा होत असून रेल्वेला महसूलही मिळत आहे. आता याच प्रयत्नात भर घालत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे प्रवाशांसाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील पॉड हॉटेल (NINFRIS) नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल उत्पन्न योजनेअंतर्गत विकसित केले जात आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गावरील प्रतीक्षालयाजवळ प्रवाशांना अधिक आरामदायी, परवडणारा आणि स्वस्तात राहण्याचा पर्याय देण्यासाठी हे खुले करण्यात आले आहे. एकूण ४० पॉड्स आहेत ज्यात ३० सिंगल पॉड्स, ६ दुहेरी पॉड्स आणि ४ फॅमिली पॉड्स आहेत. या उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये संपूर्ण गोपनीयता, मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम इ. आहेत. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड (रिसेप्शनवर) आणि मोबाइल ॲपवर ऑनलाइन मोडद्वारे केले जाऊ शकते. मध्य रेल्वेने नमह एंटरप्रायझेसला स्लीपिंग पॉड्सच्या विकास आणि ऑपरेशनचे कंत्राट रु. १०,०७,७८७/- वार्षिक लायसन्स फीमध्ये दिले आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी रेल्वेला रु. ५५.६८ लाख महसूल मिळेल. ज्या प्रवाशांना टर्मिनसजवळच राहायचे आहे त्यांच्यासाठी आरामदायी मुक्कामासाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने नुकतीच १३१.६१ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये नॉन-फेअर महसूल निर्मितीत सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या मध्य रेल्वेने या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत, म्हणजे एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत नॉन-फेअर महसूलाद्वारे नव-नवीन उपक्रम आणले आहेत. एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत १.८९ कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिल ते जून २०२२ या कालावधीतील १४.८९ कोटी रुपये महसूल, ६४६% ची अविश्वसनीय वाढ दर्शवते. प्रवाशांना अधिक आराम देण्यासाठी हायब्रिड ऑन बोर्ड हाउसिंग सर्विस कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिलॉकर्स, पर्सनल केअर सेंटर्स, ई-बाईक, ई-चार्जिंग पॉइंट्स, कंटेंट ऑन डिमांड, कॉन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह इत्यादी विविध नॉन-फेअर रेव्हेन्यू संकल्पना सुरू करण्यात आल्या आहेत. नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत असे आणखी बरेच उपक्रम घेतले जात आहेत ज्यामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला महसूल देखील मिळेल. असाच उपक्रम आयआरसीटिसी ने गेल्या वर्षी मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे येथे सुरू केला होता.

Updated : 5 July 2022 1:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top