PUNE ; एकल पालकांसाठी 'इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ' संस्थेचा पुढाकार...
तुम्ही किंवा तुमच्या माहितीतील कोणी एकल पालक असतील तर हि माहिती त्यांच्या पर्यन्त ७७६८०४८१५३ अथवा ९५१८७५९१७१ या नंबरवर नक्की पोहचवा.
X
सध्या जगावर कोरोना (Corona) महामारीचे संकट घोंगावत आहे. मागील दीड वर्षांमध्ये कोरोनाने अनेक लोकांचे जीव घेतले. या कालावधीत एकल पालकांच्या (single parents) संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या काहीतरी करण्याची गरज होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करत एकल पालकांना त्यांच्या मुलांना भावनिक तसेच सामाजिक आधार देणे त्याचबरोबर त्यांना इतर काही समस्या असतील तर त्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी एकत्रित प्रयत्न व्हावा म्हणून 'इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ' ही संस्था 'स्वमदत गट' सुरु करत आहे.
यामध्ये 'एकल माता पालक आणि एकल पिता पालक' असे दोन स्वतंत्र गट असणार आहेत. खरतर आईवडील होणं किती महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे हे फक्त पालकांनाच समजू शकते. आपल्या मुलांचे चांगले संगोपन करणे, त्यांच्या आयुष्यात यश मिळावं म्हणून सतत झटत राहणं या सोबत त्यांना चांगले संस्कार देऊन त्यांचे आयुष्य घडवण्याची जबाबदारी पालक आनंदाने स्वीकारत असतात. पण जर हीच महत्त्वपूर्ण जबाबदारी काही अपरिहार्य कारणामुळे कोणा एकाच्याच खांद्यावर आली तर ते निभावणं त्यांना कठीण जातं. खरं तर एकल पालक हा शब्द बोलायला सोपा वाटतो. पण हे आव्हान पेलणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यामुळे एकूणच प्रवासात स्वतःच्या आणि मुलांच्या भावनांच्या नियोजनासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांची 'इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ' (Institute for Psychological Health) ही संस्था आता पुढे आली आहे. त्या संस्थेमार्फत आता अशा एकल पालकांसाठी स्व-मदत गट तयार केले जाणार आहेत. ही संस्था मागील 30 वर्षांपासून सुदृढ मन सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन काम करते आहे.