Home > News > कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती...

कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती...

कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती...
X

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (joe biden) यांनी शुक्रवारी काही काळासाठी आपले अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस ( Kamala Harris ) यांच्याकडे हस्तांतरित केले. पुढच्या 25 तासांसाठी हे अधिकार त्यांनी कमला हॅरीस यांच्याकडे सोपवले आहेत. जो बिडेन हे नियमित कोलोनोस्कोपीसाठी गेले असून त्यामुळे अमेरिकेची ( United States) सत्ता उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे काही काळ राहील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन काल रात्री उशिरा दरवर्षी होणाऱ्या कोलोनोस्कोपीसाठी ऍनेस्थेसिया घेणार होते.

बिडेन यांचा आज त्यांचा ७९ वा वाढदिवस

अमेरिकेच्या इतिहासातील बिडेन हे सर्वात वयस्कर अध्यक्षपद भूषवणारे व्यक्ती आहेत. बिडेन शनिवारी त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. CNN च्या रिपोर्टनुसार, त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुक्रवारी सकाळी ते वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये गेला होता. त्यांच्यावर दरवर्षी उपचार होत असले तरी यावर्षी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नियमित उपचारास उशीर झाला होता. त्यामुळे अध्यक्ष झाल्यानंतर ते आता उपचारासाठी गेले आहेत. यावेळी हॅरिस यांना अध्यक्षीय (presidential power) अधिकार दिले जातील.

कमला यांनी अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई (The US' first female, first Black and first South Asian vice president) वंशाच्या उपराष्ट्रपती झाल्या. पास्कीच्या म्हणण्यानुसार, पुढच्या 25 तासांसाठी कमला हॅरीस अध्यक्षीय जबाबदाऱ्या पार पडतील. परंतु त्या त्यांच्या वेस्ट विंग कार्यालयातून कामकाज पाहतील.

अध्यक्षीय अधिकार उपराष्ट्रपतींना सोपवणे नवीन नाही

अमेरिकन राज्यघटनेच्या 25 व्या दुरुस्तीच्या कलम-3 अंतर्गत अध्यक्षीय अधिकार हस्तांतरित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. उपराष्ट्रपतींची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यासाठी राष्ट्रपती हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि अमेरिकन संसदेच्या सिनेटच्या अध्यक्षांना पत्र लिहू शकतात.

Updated : 20 Nov 2021 7:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top