देशात कोरोनाचे 188 नवीन रुग्ण तर तीन जणांचा मृत्यू
X
चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने भारत, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सांगितले की, 11 दिवसांत देशात आलेल्या 124 आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचे 11 उप-प्रकार आढळले आहेत.
एशिया टाईम्सच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात चीनच्या 40% लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी दावा केला आहे की येथील प्रत्येक शहरातील सुमारे 50% लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान 250 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चिनी हेल्थ एजन्सीच्या लीक झालेल्या माहितीत उघड झाले आहे.
भारतात कोरोनाची काय स्थिती..?
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 5 जानेवारीच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे 188 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉन उप-प्रकार BF.7 ची चार नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. हे लोक नुकतेच अमेरिकेतून परतले होते. चार लोकांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत आणि ते नादिया जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, तर एक व्यक्ती बिहारचा आहे परंतु सध्या कोलकाता येथे राहतो.
WHO ने सांगितले आले की XBB.1.5 आता 29 देशांमध्ये पसरला आहे..
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) XBB.1.5 प्रकाराबाबत चेतावणी जारी केली आहे. डब्ल्यूएचओच्या डॉक्टर मारिया व्हॅन केरखोव्हच्या मते, हा प्रकार आतापर्यंत 29 देशांमध्ये आढळला आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रकार वेगाने पसरत आहे आणि जुन्या व्हॅरियंटची जागा घेत आहे. त्यामुळे जगात कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका वाढला आहे.