IAS अश्विनी भिडे यांची पुन्हा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
X
मुंबई मेट्रोच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अश्विनी भिडे यांना या पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रोच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अश्विनी भिडे या फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो-3 या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि ठाकरे सरकार सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांनी आरे मधून कारशेड हटवण्याचा निर्णय घेतला. आरे ऐवजी कांजूरमार्ग या ठिकाणी हे कारशेट करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि याच वेळी अश्विनी भिडे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत होत्या. आता पुन्हा एकदा त्यांची मेट्रो तीन या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.