Home > News > मीग- २१ लढाऊ विमान कोसळले,दोन वैमानिक शहीद

मीग- २१ लढाऊ विमान कोसळले,दोन वैमानिक शहीद

राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातील बारमेरजवळ मिग 21 हे लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला.

मीग- २१ लढाऊ विमान कोसळले,दोन वैमानिक शहीद
X

राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातील बारमेरजवळ मिग 21 हे लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय हवाई दलाच्या दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अपघातग्रस्त लढाऊ विमानाने बुधवारी रात्री प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. उड्डाण करत असतानाच अचानक या विमानाने हवेतच पेट घेतला आणि अगदी काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे वैमानिकांना बाहेर निघण्यासाठी वेळच मिळाला नाही. बुधवारी रात्री 9.10 वाजता हा भीषण अपघात राजस्थान मधील पाकिस्तान सीमेजवळ असणऱ्या बारमेर इथे झाला .

अपघातग्रस्त विमान हे रशियन लढाऊ विमानाचे ट्रेनर व्हर्जन होते. अशा जेटच्या ट्रेनर व्हर्जनमध्ये दोन पायलट असतात

संरक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांच्याशी बोलून या अपघाताची माहिती घेतली. हवाईदलाच्या प्रमुखांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल हळहळ व्यक्त केली.

"राजस्थानमधील बारमेरजवळ आयएएफच्या मिग-21 ट्रेनर विमानाला झालेल्या अपघातामुळे दोन हवाई योद्धे शहीद झाल्यामुळे खूप दुःख झाले आहे. त्यांची देशासाठीची सेवा कधीही विसरता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत,"

https://twitter.com/rajnathsingh/status/1552709650235043846?t=yjRApNSj5jFFxuaUrmCUmw&s=19

अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या एका वर्षात Mig-21 चे सहा अपघात

गेल्या वर्षी जानेवारीपासून किमान सहा मिग-21 विमाने कोसळली असून त्यात पाच वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच, गेल्या पाच वर्षांत सशस्त्र दलांमध्ये ४६ विमाने आणि हेलिकॉप्टर अपघातांमध्ये किमान ४४ लष्करी जवानांना जीव गमवावा लागला आहे. जुन्या सोव्हिएत युनियनची निर्मिती असलेले मिग-21, 1963 मध्ये IAF द्वारे समाविष्ट केलेले पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये या विमानाचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

मिग-21 विमाने फार पूर्वीच निवृत्त व्हायला हवी होती. नवीन लढाऊ विमाने, विशेषत: स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) समाविष्ट करण्यात मोठा उशीर झाला आहे. याचाच अर्थ असा आहे की भारतीय हवाईदल तेजस विमानांना `बायसन' मानांकन मिळेपर्यंत चार गटांमध्ये Mig-21 विमान चालवते. या प्रत्येक गटात प्रत्येकाकडे 16-18 जेट्स आहेत.

Updated : 29 July 2022 9:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top