Home > News > ‘ही गुंड विकास दुबेची पोरं’ अशी माझ्या मुलांची ओळख मला नकोय...

‘ही गुंड विकास दुबेची पोरं’ अशी माझ्या मुलांची ओळख मला नकोय...

‘ही गुंड विकास दुबेची पोरं’ अशी माझ्या मुलांची ओळख मला नकोय...
X

‘ विकासने ८ पोलिसांना मारल्याची बातमी मी टीव्हीवर पाहात होते पण, विकास मला काहीही सांगत नव्हता. मी सासरी इच्छा नसताना रहात होते. विकास दुबे या गँगस्टरची ही मुलं आहेत अशी माझ्या मुलांची ओळख व्हावी असं मला वाटत नाही. मी त्यांना सांभाळते. त्यांनी विकाससारखं गुंड बनाव असं मला मुळीच वाटत नाही म्हणून मी त्यांना गुन्हेगारांपासून लांब ठेवलंय.’ ही प्रतिक्रीया आहे उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास याची पत्नी ऋचा दुबे यांची. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना ऋचा दुबेने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

या पुढं बोलताना त्या म्हणाल्या की, ‘विकास मलाही खुप त्रास द्यायचा त्यावरुन सांगते त्याने इतरांना किती त्रास दिला असेल. विकास दुबेने अनेक घरं बर्बाद केली आहेत. तो जर माझ्यासमोर आला असता तर मीच त्याला गोळी मारली असती. त्यामुळे पोलीसांनी जे काही केलं ते योग्यच केलं. माझा विकासने केलेल्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही. मी त्याच्या मुलांना सांभाळते.’ असंही ऋचा दुबेने म्हटलं आहे.

Updated : 24 July 2020 6:53 AM IST
Next Story
Share it
Top