अनेक महिलांना स्वावलंबी करणारे हुकमीचंद चोरडिया गेले..
X
हुकमीचंद चोरडिया म्हणजेच 'प्रविण मसाला'चे मालक त्यांचे काल वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. खरतर मसाला या क्षेत्रात त्यांनी अगदी शून्यातून इथपर्यंतचे हे विश्व उभं केलं होतं. 1962 साली त्यांनी प्रविण मसाला या कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी हा उद्योग फक्त उभाचं केला नाही तर या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देत स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं केलं...
कसे घडले हुकमीचंद सुकलाल चोरडिया..
मसाला आणि लोणचं म्हटलं की आपल्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे 'प्रविण मसालेवाले'. आज देखील अगदी घराघरात म्हंटल जात की, 'लोणचे प्रावीचेच...' हे सगळं उभा करण्यासाठी हुकमीचंद यांनी अगदी वयाच्या साठी पर्यंत अफाट प्रयत्न केले आहेत. सर्वसामान्य मारवाडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंबात पूर्वीपासूनच मिरच्यांच्या बियांचा धंदा होता. त्यातून मिळणाऱ्या पैशातून पोटभर अन्न सुद्धा मिळण्याची वनवा होती. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपण काहीतरी करावं आणि मोठा उद्योजक व्हावं हे स्वप्न लहानपणीच पाहिले होते. मग त्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक धंदे करून पाहिले. पण त्यात त्यांना यश आले नाही. प्रत्येक अपयशात काहीतरी नवीन शिकत त्यांनी हार मानली नाही.
शेवटी काय करायचं या चिंतेत असलेल्या हुकमीचंद यांनी स्वतःच्या घरातच 'आनंद मसाला' हा घरगुती मसाला तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना साथ मिळाली ती त्यांची पत्नी कमलाबाई यांची. कमलाबाई आपला सगळा सासर रेटत नवऱ्याने सुरू केलेल्या व्यवसायात मदत करत होत्या. मग हळूहळू हा व्यवसाय वाढू लागला. लोकांना घरोघरी फिरून मसाले विक्रीला करण्यास हुकमीचंद यांनी सुरुवात केली. ते त्यावेळी पुण्याला नोकरी करत होते मग नोकरी करत असताना रोज संध्याकाळी त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना आपला मसाले विकण्यास सुरवात केली.
पूर्वीचा मिरचीच्या बियांचा व्यबसाय सुरू होता त्या निमित्ताने त्यांचं अनेक ठिकाणी फिरणं होतं होतं. हे काम करत असताना त्यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली आणि कल्पनेतून त्यांनी गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला तयार करण्यास सुरुवात केली. आता त्यांनी बनवलेले हे मसाले सुद्धा घरोघरी जाऊन विकण्यास सुरुवात केली.
प्रवीण मसाल्याची स्थापना कधी झाली?
आता व्यवसाय हळूहळू वाढू लागला होता. लोकांना त्यांनी बनवलेले मसाले अत्यंत आवडू लागले होते. ठीक ठिकाणी त्यांनी बनवलेल्या मसाल्यांची चर्चा सुरू झाली होती. मग हुकमीचंद यांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय होता प्रवीण मसाले या नावाने व्यवसाय सुरू करण्याचा. 1960 सली त्यांनी प्रविण मसाले हा नवीन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात सुद्धा त्यांना पहिली दहा वर्ष अत्यंत कष्ट करावे लागले. दहा वर्षाच्या मेहणतीनंतर हडपसर इथल्या MIDC मध्ये त्यांनी एक जागा घेतली व 1972 मध्ये या व्यवसायाचा विस्तार केला. व्यवसायाचा विस्तार त्यांनी इतका मोठा केला होता की एका वेळी 500 किलो लोणचे तयार करून ते बाजारात विक्रीसाठी आणले.
साधेपणा हुकमीचंद यांनी शेवटपर्यंत सोडला नाही..
प्रवीण मसाले हे आज संपूर्ण भारतभर घेतले जातात. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची उत्पादन केंद्रे आहेत. व्यवसायात इतके मोठे यश मिळवल्यानंतर देखील हुकमीचंद यांनी शेवटपर्यंत साधेपणा सोडला नाही. व्यवसाय करत असताना तो व्यवसाय अत्याधुनिक पद्धतीने करणे व अत्यंत साधं राहणीमान हे हुकमीचंद यांचे वैशिष्ट्य होते.