पॅन-आधार लिंक आहे की नाही कसे पाहायचे?
X
तुम्ही अजून पॅन-आधार लिंक केले नसेल तर आजच करा. कारण आधार व पण जोडण्यासाठी सरकारने ३० जूनपर्यंत म्हणजेच आजपर्यंतची मुदत दिली आहे. आज हे केले नाही तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होऊन जाईल. आता अनेकांना प्रश्न असेल की आपलं पॅन कार्ड आधार कार्डची लिंक झालं आहे की नाही हे कुठे तपासून पाहायचं. तर काही काळजी करू नका याबाबतची सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगू...
सर्वात पहिला तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यासाठी तुम्ही incometaxgov वर जाऊन भेट द्या..
त्या ठिकाणी तुम्हाला लिंक आधार स्टेटस तपासण्याचा एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा..
त्यानंतर तुमच्यासमोर जे पेज ओपन होईल त्या पेज वरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल..
त्यानंतर व्ह्यू आधार लिंक स्टेटस वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही याबाबत तुम्हाला माहिती मिळेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..