कपूर, खान नाही तर मुबंईत झोपडपट्टीत राहणाऱ्या मलीशा खारवाने करून दाखवलंय..
X
मुंबईतील झोपडपट्टी म्हणजे टॅलेंट न भरलेला खुराडा आहे.. इथं तुम्ही जे शोधाल ते सापडतं. या झोपडपट्टी भागात मुलांमध्ये असलेलं टॅलेंट अलीकडच्या काळात जगासमोर येत आहे. काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता तो चित्रपटात या झोपडपट्टीत राहणार एक मुलगा एका शोमध्ये सहभागी होतो आणि करोडपती बनतो असंच काहीसं या चित्रपटाचे कथानक आहे.. तो करोडपती बनतो पण त्या पाठीमागे असतं त्याच्या भन्नाट टॅलेंट. असंच काहीसं मागच्या अनेक वर्षांपासून घडतंय अनेक रॅपर यात झोपडपट्टीतून उद्यास आले आहेत ज्यांनी त्यांच्या रॅप सॉंग द्वारे संपूर्ण जगाला वेड लावला आहे. आता याच झोपडपट्टीतील एक मुलगी पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आहे..

मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीत राहाणारी 14 वर्षांची एक मुलगी, तिला तिच्या परिसरातही फारसं कोणी ओळखत नव्हतं. पण लाखो लोकं तिच्याबद्दल चर्चा करतायत. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या मुलीचं नाव आहे मलीशा खारवा.. मलीशा खारवा ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. नुकतंच तिला प्रसिद्ध ब्यूटी प्रोडक्ट असलेल्या फॉरेस्ट एसेंशियल्स या कंपनीने आपलं ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं. फॉरेस्ट एसेंशियल्सचा 'द युवती' कलेक्शनचा ती मुख्य चेहरा बनलीय. आता अशा मॅक्झिनवर आपला फोटो छापून यावा यासाठी संपूर्ण करिअर मध्ये प्रयत्न करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री असतील किंवा अनेक मॉडेल्स असतील त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळत नाही त्या ठिकाणी ही झोपडपट्टी राहणारी सर्वसाधारण दिसणारी मुलगी कशी काय पोहोचली? याची तुम्हा सर्वांना उत्सुकता असेल म्हणूनच ही मुलगी कोण आहे? आणि तिचा संघर्ष काय आहे? थोडक्यात पाहुयात...

मलीशा ही फार पूर्वीपासून तिच्या इंस्टाग्राम वर फार ऍक्टिव्ह आहे वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओज करून ती इंस्टाग्राम वर शेअर करत असते.. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅनने एका म्युझिक शूटिंगसाठी भारतात आला होता आणि भारतात आल्यानंतर त्याची या मुलीशी भेट झाली. या मुलीतील हे टॅलेंट पाहिल्यानंतर त्यांनी तिच्यासाठी अनेक संधीचे दरवाजे खुले केले. त्यांनी मलीशाच्या मदतीसाठी काऊड फंडिंग अकाऊंटही सुरु केलं होतं. त्यात आतापर्यंत जवळपास 10.7 लाख रुपये जमा झाले. या पाठीमागे मलेशियाचे अपार कष्ट देखील आहेत. पूर्वीपासून ती अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते आजपर्यंत तिने अनेक मॉडेलिंग इव्हेंट मध्ये भाग घेतला आहे. या तिच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं ते फॉरेस्ट एसेंशियल्सचं ब्रँड अँम्बेसेडर झाल्यानंतर.. अनेकांचं जे स्वप्न असतं ते या मुलीने कष्टाने मिळवून दाखवलं आहे.. मित्र-मैत्रिणींनो अभिनेते अभिनेत्री यांचे सर्व व्हिडिओ आपण शेअर करतो पण आपल्या महाराष्ट्रातील मुंबईतील अस्सल टॅलेंट असलेल्या या मुलीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ही कौतुकास्पद माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे...
