हेमा मालिनी यांना 'ड्रीम गर्ल' चित्रपटामुळे नाही; तर या कारणामुळे म्हणतात ड्रीम गर्ल
X
बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हां डायलॉग इतका फेमस आहे की आपण सहज जरी कोणाच्या तोंडून ऐकला तर लगेचचं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे शोले चित्रपटाचा तो सीन ज्यामधे गब्बरने चित्रपटातील नायिका बसंतीला म्हंजेच (हेमा मालिनी) ला किडनॅप केललं असतं, चित्रपटातील नायक वीरू (धर्मेंद्र) घोड्यावर बसून तिचा बचाव करण्यासाठी रवाना होतो. गब्बरची लोकं विरूलाही कैद करतात, जेंव्हा गब्बर बसंतीला नाचायला सांगतो तेंव्हा आवाज येतो "बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना" तर शोले पासून सीता और गीता,क्रांति, जुगनू, बागवान सारखे सुपरहीट चित्रपट देणाऱ्या बसंतीला म्हणजेच हेमा मालिनीला ड्रीम गर्ल का म्हणतात काय आहे तो किस्सा ज्यावरून हेमामालिनी झाली ड्रीम गर्ल जाणून घ्या
अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या काळातल्या सुपरस्टार अभिनेत्री आहेत. त्यांनी केलेल्या सिनेमांची आणि त्यांच्या भूमिकांची चर्चा कायमच होत असते. सपनो का सौदागर हा हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट असून, या चित्रपटाचे नायक राज कपूर होते. बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीत भरगोस यश मिळवले आहे. हेमाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, तिला कधीही चित्रपटात यायचे नव्हते. तिला नृत्याची आवड होती आणि ती एक व्यावसायिक नृतिका होती. हेमाच्या आईची इच्छा होती की तिने चित्रपटात हात आजमावावा. हेमाने आईच्या सांगण्यावरून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि ती बॉलिवूडची ड्रीमगर्ल बनली.
जितेंद्र आणि संजीव कुमार यांच्याशी अफेअरच्या चर्चेत असणारी हेमा पुढे जाऊन धर्मेंद्र यांच्यासोबत सिनेमांत काम करताना आपल्या लग्नाचे सुर जुळवते आणि हे दोघे लग्नबंधनात बंधीत होतात. फिल्मी दुनियेतले पार्टनर रिल लाइफचे पार्टनर बनतात. ड्रीम गर्ल हे नावं कसं पडलं याचा विचार केला तर अनेकांना असं वाटतं की ड्रीम गर्ल या सिनेमामुळे आणि त्यातल्या किसी शायर की गझल ड्रीम गर्ल या गाण्यामुळे त्यांना ड्रीम गर्ल हे टोपण नाव पडलं. पण खरा किस्सा वेगळाच आहे.
सपनो का सौदागर हा सिनेमा आला तेव्हा सिनेमाचे निर्माते बी अनंतस्वामी आणि इतर सिनेमा मेकर्स प्रसिद्धीसाठी एक वन लायनर शोधत होते. बराच विचार केल्यानंतर बी. अनंतस्वामी यांनी सपनो के सौदागरच्या हेमामालिनीच्या पोस्टरखाली लिहिलं ‘राज कपूर की ड्रीम गर्ल’ हा त्या काळातला पब्लिसिटी स्टंट होता, असं म्हटल जातं. 45 वर्षीय राज कपूर 20 वर्षीय हेमा मालिनीसोबत, राज कपूरची ड्रीम गर्ल अशी एक टॅगलाईन देऊनच अनंतस्वामी यांनी सिनेमाची पोस्टर्स रंगवली आणि ती प्रसिद्ध झाली.
सिनेमा या टॅगलाईनमुळे खूप जास्त चालला वगैरे असं मुळीच झालं नाही. पण हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल हे नाव मिळालं ते पहिल्या चित्रपटापासूनच.
सपनो का सौदागरनंतर खासगीत अनेक जण हेमा मालिनी यांचा उल्लेख ड्रीम गर्ल करायचे. पण ड्रीम गर्ल सिनेमा आल्यावर आणि ड्रीम गर्ल हे त्यातलं टायटल साँग आल्यावर हेमा मालिनी सगळ्या जगालची ड्रीम गर्ल झाल्या . तर असा आहे या खास टोपण नावामागचा किस्सा.