मुंबई महापालिकेचे सर्व खासगी कार्यालयांना आवाहन
X
मुंबईत आज आणि उद्या असे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह उपनगरात आज 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला अतिवृष्टी (Mumbai Heavy Rain Alert) होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावं. असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला आहे. तसंच समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकांनी टाळावे. असं आवाहन केलं आहे.
हे ही वाचा
Video : खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना कोरोनाची लागण
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, अमृता फडणवीस यांचा आरोप
ठाण्यातही रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या 3- दिवसात पाऊस थांबला होता. पण सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झालीये. भारतीय हवामान खात्यानेही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबईत खूप पाऊस असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा वाढलेला नाही.