…त्याने बायकोशी भांडण केलं आणि रागात राहतं घरच पेटवलं
रागाच्या भरात लोक काय काय करतील याचा काही भरवसा नाही. सोलापूरात एकाने बायकोशी भांडण करून राहतं घरच पेटवलं
Max Woman | 22 March 2022 4:44 PM IST
X
X
सोलापुरातील अंबिका नगर, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला पतीने आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत घरातील सर्वच प्रपंचीक साहित्य जळून खाक झालं असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झालंय. श्यामसुंदर भंडारी असं घर पेटवून देणाऱ्या पतीच नाव आहे. या आगीमध्ये घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने ही आग धुमसतच होती, मात्र योग्यवेळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे मोठी दुर्घटना होताना टाळली.
Updated : 22 March 2022 4:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire