Home > News > QR कोड स्कॅन करून पैसे देत असाल तर सावधान; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते

QR कोड स्कॅन करून पैसे देत असाल तर सावधान; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते

तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही QR स्कॅन करताच तुमच्या खात्यातील पैसे निघून दुसऱ्याच्या खात्यात जाऊ शकतात? जर तुम्ही या दृष्टीकोनातून कधी विचार केला नसेल तर आज नक्की विचार करा. अन्यथा, एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

QR कोड स्कॅन करून पैसे देत असाल तर सावधान; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते
X

डिजिटल पेमेंटच्या जमान्यात लोकांना रोख रक्कम बाळगणे आता बिलकुल आवडत नाही. तुम्ही कुठेही जाल, तुम्हाला QR कोड सहज उपलब्ध आहे आणि तो स्कॅन करून पेमेंट केलं झालं खिश्यात रोकड ठेवायची गरजच नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही QR स्कॅन करताच तुमच्या खात्यातील पैसे निघून दुसऱ्याच्या खात्यात जाऊ शकतात? जर तुम्ही या दृष्टीकोनातून कधी विचार केला नसेल तर आज नक्की विचार करा. अन्यथा, एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळेच हे टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बँकेने ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि QR स्कॅनद्वारे होणारी फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे.

SBI ने म्हंटले आहे 'स्कॅन या स्कॅम?'

SBI ने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये क्यूआर स्कॅनची प्रक्रिया दाखवून 'स्कॅन या स्कॅम?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्हिडिओत त्यांनी कधीही अज्ञात QR कोड स्कॅन न करण्याचा सल्ला दिला आहे. पण नक्की कोणता QR कोट स्कॅन नाही करायचा तर क्यूआर कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा असं सांगून जे QR कोड व्हॅरल केले जातात अशा संदेशांपासून सावध राहा, असेही एसबीआयने ट्विट केले आहे. जर कोणी तुम्हाला पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. अनोळखी फोन नंबर्सचा विचार करू नका. अज्ञात आणि असत्यापित QR कोड स्कॅन करू नका असं सुद्धा SBI ने ट्विट मध्ये म्हंटल आहे.

QR कोड म्हणजे काय?

QR कोड म्हणजे द्रुत प्रतिसाद कोड. हा बार कोड सारखाच कोड आहे. त्यात काहीही लिहिलेले नाही. काळ्या रंगाचा असणाऱ्या या QR कोड मध्ये URL एम्बेड केलेले आहे. जेव्हा आपण आपल्या मोबाईलने QR कोड स्कॅन करतो तेव्हा ते एम्बेडेड URL स्कॅन होते. स्कॅन केल्यावर हे तुम्हाला वेबसाइटच्या URL शी जोडते. याद्वारे QR फिशिंग होते.

QR फिशिंग म्हणजे काय?

वापरकर्त्याच्या खात्याशी संबंधित डेटा तुम्हाला QR कोडमध्ये दिसत असलेल्या पॅटर्न कोडमध्ये सेव्ह केला जातो. जेव्हा तुम्ही मोबाईल फोनने कोड स्कॅन करता तेव्हा त्यात सेव्ह केलेला डेटा डिजिटल भाषेत रूपांतरित होतो. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात. याला QR फिशिंग म्हणतात.

तुमच्यासोबत कोणतीही फसवणूक तर होत नाहीये ना? हे असं तपासायचे पहा..

क्रेडिट स्कोअरवर तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या कर्ज खात्यांची संख्या तपासू शकता.

तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी तुम्हाला क्रेडिट ब्युरोची सेवा घेणे आवश्यक आहे.

तुम्ही TransUnion CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark सारख्या ब्युरोची सेवा घेऊ शकता.

SBI कार्ड, पेटीएम आणि बँक बाजार यांसारख्या साइट्स ब्युरोसह भागीदारी करून अहवाल तपासण्याची सुविधा देखील प्रदान करतात.

जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन नंबर यासारखी काही माहिती देऊन तुम्ही तुमचे खाते तयार करू शकता आणि तुमचा क्रेडिट स्कोर तपासू शकता.

लॉग इन करून, तुम्ही तुमच्या नावावर किती कर्ज खाती चालू आहेत ते पाहू शकता.

जर एखादे खाते चालू असेल, ज्याची तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही त्याबद्दल आयकर वेबसाइटवर तक्रार करू शकता.

Updated : 30 March 2022 2:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top