Home > News > ग्रामपंचायत निवडणूक: पंकजा मुंडे कुठं आहेत?

ग्रामपंचायत निवडणूक: पंकजा मुंडे कुठं आहेत?

ग्रामपंचायत निवडणूक: पंकजा मुंडे कुठं आहेत?
X

एरवी ग्रामपंचायत निवडणूकीत नेते फारसे लक्ष घालत नसत. मात्र, गेल्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लक्ष घालत पक्ष ग्राउंड लेव्हलला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर राज्यातील बड्या नेत्यांनी देखील आपल्या जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

सध्या राज्यात कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पक्षाचे नेते आपआपल्या मतदारसंघात लक्ष घालून आपल्या पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणूका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बीड जिल्हामध्ये खाता पिता राजकारणावर गप्पा सुरु असतात. असं म्हटलं जातं. तू धनू भाऊ कडून की पंकजाताई कडून अशा चर्चा सतत कानावर पडत असतात. बीड मध्ये एकूण 129 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान पार पडत आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे नेते आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: लक्ष घालत 4 ग्रामपंचायत बिनविरोध केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 4 ग्रामपंचायत बिनविरोध आणल्या आहेत.

मात्र, भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या निवडणुकीत Active नसल्याचं मॅक्समहाराष्ट्रचे बीड चे प्रतिनिधी विनोद जीरे यांनी सांगितले. या संदर्भात आम्ही पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचं सांगितलं. गावपातळीच्या निवडणुकांमध्ये लक्ष घातल्यानं वरच्य़ा निवडणुकांवर परिणाम होतो. म्हणून सहसा नेते ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लक्ष घालत नाही. त्यामुळे अनेक नेते ग्रामपंचायतीच्या फंद्यात पडत नाही. अशी काहीशी परिस्थिती ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.


Updated : 5 Jan 2021 9:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top