Home > News > Chinese Apps Ban: मोदी सरकारचा आणखी एक डिजिटल दणका

Chinese Apps Ban: मोदी सरकारचा आणखी एक डिजिटल दणका

Chinese Apps Ban:  मोदी सरकारचा आणखी एक डिजिटल दणका
X

भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करु शकतील अशा ५४ चायनीच एप्सवर बंदी घालण्याचा निर्णय़ केंद्र सरकारने घेतला आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यामध्ये Beauty Camera, Selfie Camera, Equalizer, Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2, Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock, Dual Space Lite यासारख्या एप्सचा समावेश आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने ५९ चीनी मोबाईल एप्सवर बंदी घातली होती. यामध्ये TikTok, WeChat आणि Hello एपचा समावेश होता.

गेल्यावर्षी बंदी घालण्यात आलेल्या एप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डाटा गोळा करण्यात येऊन तो बाहेर पाठवला जात असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला होता. त्यानंतर गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारने देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांचा हवाला देत ५९ चीनी एप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने सुरक्षेचा धोका असल्याचे सांगत ११८ चीनी एप्सवर बंदी घातली होती.

Updated : 14 Feb 2022 11:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top