बालमित्रासोबत लग्न करण्यासाठी घरातून चार वेळा पळाली तरुणी, पण अखेर...
X
आरोपी आणि गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस ठाण्याचा उपयोग होत असतो, मात्र बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील डेहरी येथे असलेल्या महिला पोलीस ठाण्यात शुक्रवारी आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. कारण या पोलिस स्टेशनमध्ये एका प्रेमी जोडपं पोलिसांच्या साक्षीने विवाह बंधनात अडकले. विशेष म्हणजे बालपणाच्या मित्रासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसी 4 वेळा तिच्या घरातून पळून गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमी अभयकांत आणि प्रेमीका प्रियंका हे बालपणाचे मित्र होते तसेच गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुद्धा होते. पण मुलाचे आणि मुलीचे कुटुंब या लग्नासाठी नव्हते. मुलीकडच्या मंडळींनी अनकेदा प्रियंकासाठी मुलगा सुद्धा पहिला पण याचवेळी ति घरातून पाळून जायची, प्रियंकाने आपल्या मर्जीनुसार लग्न होत नसल्याने आतापर्यंत चार वेळा घरातून पळ काढला. मात्र अखेर हतबल झालेल्या प्रियंकाने पोलीस ठाणे गाठत सगळी कहाणी सांगितली.
त्यानंतर पोलिसांनी प्रियकर अभयकांतला पोलिस ठाण्यात बोलावले, जिथे त्याने तो लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. या दोघांच्या संमतीनंतर तातडीने पोलिस स्टेशन आवारात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर दोघांनीही हिंदू परंपरेनुसार विधिवत विवाह केला गेला. प्रियकर आणि प्रेयसीचे नातेवाईक या लग्नासाठी तयार नव्हते, पण दोघांचे वय पाहता त्यांना कायदेशीररीत्या आपल्या लग्नाचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने अखेर पोलिसांच्या उपस्थितीत हे लग्नसमारंभ पार पडले.