Home > News > "वाती ते मूर्ती एका छताखाली"

"वाती ते मूर्ती एका छताखाली"

वाती ते मूर्ती एका छताखाली
X

गणपतीच्या सणाची सध्या जोरदार तयारी लोकं करत आहेत.गणपतीच्या सजावटीसाठी तसेच गणेशोत्सवात लागणाऱ्या साहित्यासाठी बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.ठराविक वस्तूंचे स्टॉल वेगवेगळे मांडलेले दिसतात.)पण लोकांना आता गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू एकाच छताखाली मिळण्याची सुविधा पुणे शहर काँग्रेस,प्रियदर्शनी वुमेन्स फोरम आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही गौरी गणपती साहित्य जत्रा भरवण्यात येणार आहे.

"वाती ते मूर्ती एका छताखाली" या अंतर्गत गौरी गणपती साहित्य जत्रा पुण्यातील काँग्रेस भवन पटांगणात सुरू होणार आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान ही साहित्य जत्रा भरवण्यात येणार आहे .

त्यामुळे पुणे शहरातील गणेश भक्तांना आता गौरी गणपतीचे साहित्य एकाच ठिकाणी मिळणार आहे.या उपक्रमामुळे गणेशोत्सवाची खरेदी आता सुलभ होणार आहे .

Updated : 25 Aug 2022 10:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top