Home > News > चोरीच्या संशयावरून चार आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण...

चोरीच्या संशयावरून चार आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण...

चोरीच्या संशयावरून चार आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण...
X

आदिवासी समाजातील लोकांची परिस्थिती दाखवणारा त्यांचं वास्तव समोर आणणारा 'जय-भीम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये आदिवासी लोकांवर पोलिसांनी केलेले अन्याय अत्याचार पाहिल्यावर आदिवासी समाजाचे दाहक वास्तव सर्वांसमोर आलं.आता याच प्रकारची घटना वसईत घडली आहे. दोन घासासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या चार आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल वसईत घडली.

हे प्रकरण असे आहे की, या चारही महिला बाजारासाठी आल्या होत्या. लोकांना त्या चोरी करण्यासाठी आल्या आल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसात कळवले व केवळ या संशयावरून त्यांनी या चारही महिलांना ताब्यात घेतलं इतकंच नाही तर ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मारहाण सुद्धा केली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं या चार महिलांना ताब्यात घेतल्याची कुठलीही नोंद पोलिस दप्तरी करण्यात आलेली नसल्याची माहिती आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास आता वसई पोलीस उपायुक्तांकडे देण्यात आला असून त्यांच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले आहे.

Updated : 23 Nov 2021 8:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top