बंडखोरांना चोप देण्याची भाषा करणाऱ्याच शिंदे गटात, असं नक्की काय घडलं?
X
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातच मोठे बंड केले. शिवसेनेच्या इतिहासात कधीही घडले नाही असं बंड करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांच्यासोबत या बंडात एक-दोन नाही तर 40 हून अधिक आमदार सहभागी झाले. आता आमदारांचं झालं आता चर्चा सुरू आहे शिवसेनेतील खासदार देखील बंड करणार आल्याची. पण या सगळ्या चर्चा सुरू असताना आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट शिवसेनेची कोंडी करणार अशी चर्चा आहे. कारण आता शिवसेनेचे अनेक नगरसेवक देखील शिंदे गटात जाण्यास सुरुवात झाली आहे. काल मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी शिंदे गटात उडी घेतली. मागच्या काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांना थेट आव्हान देणाऱ्या म्हात्रे अचानकच शिंदे गटात सामील झाल्या. तुम्हाला रश्मी वहिनींच्या अश्रूची शपत आहे. सोडायचं नाही. बंडखोरांना जागा दाखवून द्यायची. अशा शब्दात टीका करणाऱ्या शीतल म्हात्रे यांना पंधरा दिवसात नक्की असं काय झालं की त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आता येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. शितल म्हात्रे या मुंबईच्या माजी नगरसेविका आहेत. मुंबईतील हरिदास प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि त्या निवडून देखील आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शीतल म्हात्रे या चांगल्या संतापल्या होत्या. ज्यावेळी हेच सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये होते त्यावेळी त्यांनी शहाजी बापूंच्या ''काय तो डोंगर, काय ती झाडी आणि काय ते हॉटेल..'' याच डायलॉग प्रमाणे ''काय तो दांडा, काय ते ढुंग× सगळं कसं ओके करणार आहोत आपण'' असं म्हणत थेट आमदारांना चोप देणार असल्याची भाषा केली होती. मात्र शीतल मात्रे यांच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसात मतपरिवर्तन झालं आणि त्या स्वतःच शिंदे गटात सामील झाल्या.
कोण आहेत शीतल म्हात्रे?
शितल म्हात्रे या हरिदास पश्चिम या ठिकाणी वार्ड क्रमांक सातच्या नगरसेविका होत्या. त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. सध्या शितल म्हात्रे यांच्याकडे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती.
चोप देण्याची भाषा करणाऱ्या म्हात्रे शिंदे गटात गेल्यावर काय म्हणाल्या?
शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री व सर्व आमदारांनी हे सर्व का केलं हे ज्यावेळी आम्ही जाणून घेतलं. या सर्वांची भूमिका ज्यावेळी आम्ही सर्वांनी ऐकली त्यानंतर असं वाटलं की हीच भावना प्रत्येक शिवसैनिकाची आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणे हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे.