सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच 9 न्यायाधीशांनी एकत्र शपथ घेतली, 3 महिला न्यायाधीशांचाही समावेश
X
सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. प्रथमच 9 न्यायाधीशांनी एकत्र शपथ घेतली, ज्यात तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. सर्वांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. यासह हे देखील स्पष्ट झाले की सप्टेंबर 2027 मध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना पहिल्या महिला सरन्यायाधीश होतील.
तर पहिल्यांदाच असे घडले की, शपथविधी सोहळा सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराबाहेर आयोजित करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याचे पहिल्यांदा थेट प्रक्षेपणही करण्यात आले. या 9 नावांसाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याला मंजुरी दिली.
हे 9 जण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले
न्यायमूर्ती ओका
न्यायमूर्ती विक्रम नाथ
न्यायमूर्ती जे. माहेश्वरी
न्यायमूर्ती हिमा कोहली
न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न
न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार
न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश
न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी
न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा
तीन महिला न्यायाधीशांनीही घेतली शपथ
आज सर्वोच्च न्यायालयाला तीन नवीन महिला न्यायाधीश मिळाले आहेत. ज्यात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न, गुजरात उच्च न्यायालयाच्या पाचव्या वरिष्ठ न्यायाधीश बेला.एम.त्रिवेदी आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली याचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन 9 न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे बराच फायदा होणार आहे. कारण गेल्या दहा वर्षांत एकूण न्यायाधीशांच्या संख्येत सर्वात कमी न्यायाधीश आजघडीला कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे. सध्या 24 न्यायाधीश काम पाहत आहेत. तर 9 न्यायाधीश आल्यानंतरही एक जागा रिक्त राहील.