कोरोनाच्या लसीचा पहिला कंटेनर मुंबईत दाखल!
X
कोरोनाच्या महाभयंकर संकटावर अखेर लस उपलब्ध झाली आहे. सुमारे ११ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोवॅक्सिन या लसीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर. कोरोना मुक्तीच्या दिशेनं भारताचं पाहिलं पाऊल पडत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
राज्यात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत काल रात्री उशीरा पुण्यावरून निघालेल्या कोरोनाच्या कोवॅक्सिन या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या लसीचा पहिला कंटेनर दाखल झाला आहे. मुंबई महापालिकेला आज सकाळी ५:३० वाजता हा कंटेनर सुपूर्द करण्यात आला आहे. कोरोनावर मत करण्यासाठी सर्वत्र ही लस उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीनं पुढच्या ३ दिवसात मुंबई महापालिका क्षेत्रात या लसीचे वितरण युद्धपातळीवर केले जाणार आहे.
जनसामान्यांना ही लस घेण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ही लस सामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.